संतोष कानडे
विमानाला अॅव्हरेज किती असतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र त्याचं ठोस असं उत्तर नसलं तरी साधारण तासाला ८ टन इतकं इंधन लागतंच.
विमानाचे प्रतितास अॅव्हरेज हे ठोकपणे काढता येत नाही. विमानाचं वजन, वातावरण यावरुन इंधन जळतं.
याशिवाय उड्डाण करताना जास्त इंधन लागतं तर लँड करताना कमी इंधन लागतं. साधारपणे ८ टन प्रतितास एवढं इंधन विमानाला लागतं.
काही विमानांमध्ये गॅसोलीन वापरलं जातं तर काही विमानांमध्ये केरोसीन बेसेस इंधन वापरलं जातं.
बोइंग 747 विमान एका सेकंदात चार लीटर इंधन खर्च करते. म्हणजे एका मिनिटांमध्ये 240 लीटर इंधन खर्च करते.
एका लीटर इंधनात विमान फक्त 0.8 किमी उडू शकतं. म्हणजेच एका लीटरमध्ये जवळपास 12 लीटर फ्यूल खर्च करू शकतं.
विमान एका तासात 900 किमीचं अंतर पार करतं म्हणजे या एका तासात 14 हजार 400 लीटर इंधन खर्च करते.
विमानाला लागणारा खर्च आणि त्यावर होणारा नफा बघूनच विमानाच्या तिकीटची किंमत ठरवली जाते.
उड्डाणावेळी विमानामध्ये अतिरिक्त इंधन असतं. त्यामुळे आकाशातच इंधन संपण्याची वेळ येत नाही.