Aarti Badade
ताप असताना तुम्हाला आपल्या आहारावर आणि जीवनशैलीवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संत्री (ऑरेंज) खाल्ल्याने सर्दी आणि खोकला वाढतो. ते श्लेष्माचे उत्पादन देखील वाढवतात, ज्यामुळे तापाची समस्या अधिक वाढू शकते.
मोसंबी देखील एक आम्लयुक्त फळ आहे, जे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे वाढवते. यामुळे श्लेष्माचे उत्पादन वाढू शकते.
आंबा खाल्ल्याने घशात खवखवणे, जळजळ होऊ शकते. तापाच्या वेळी आंब्यामुळे पचनासंबंधी समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
तापाच्या वेळी जास्त आम्लयुक्त फळं आणि गोड फळं खाऊ नका, कारण ते तुमच्या लक्षणांना आणखी गंभीर करू शकतात.
तापाच्या वेळी फळांची निवड करतांना सावधगिरी बाळगा. गोड आणि आम्लयुक्त फळं टाळा.
तापाच्या वेळी योग्य फळ आणि आहार खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत मिळते.