Saisimran Ghashi
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे
पावसाळ्याला सुरुवात झाल्यास आरोग्याची काळजी घ्यावी लागते
पावसाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे ज्याने आरोग्याला धोका असतो जाणून घेऊया
पावसात रस्त्यावरचे फूड धूळ, प्रदूषण आणि पाण्यामुळे सहज दूषित होते. फूड पॉइझनिंग, जंतसंसर्ग याचा धोका वाढतो.
पावसाळ्यात वातावरण आधीच दमट असते. दही, आईसक्रीम सारखे थंड पदार्थ घशाला लागून सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो.
ओलसर हवामानात अन्न लवकर खराब होते. जुने अन्न खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते.
पावसात मासे आणि मांस लवकर खराब होतात. नीट स्वच्छता नसेल तर अन्न विषबाधा होऊ शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.