Saisimran Ghashi
किडनी खराब होण्यामागे केवळ दारू कारणीभूत नसून, आपल्याला रोजच्या आहारातील काही विशिष्ट पदार्थ देखील यामध्ये मोठी भूमिका बजावतात.
रोजच्या आहारात जास्त प्रमाणात मीठ (सोडियम) घेतल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि याचा थेट परिणाम किडनीवर होतो.
केक, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स अशा पदार्थांमुळे रक्तातील साखर वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका आणि किडनीवरचा ताण वाढतो.
तयार अन्नपदार्थांमध्ये प्रेझर्व्हेटिव्ह्ज आणि केमिकल्स असतात जे किडनीला हानी पोहचवू शकतात.
या पेयांमध्ये फॉस्फेट्स व कृत्रिम रसायने असतात, जे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.
मांसाहार किंवा प्रोटीन सप्लिमेंट्सचा अति वापर किडनीवर अतिरिक्त भार टाकतो आणि शरीराचे नुकसान करतो.
शरीरातील किडनी कार्यक्षमता हळूहळू कमी होते, पण सुरुवातीला लक्षणं स्पष्ट नसल्याने वेळेत निदान होत नाही आणि अन्नाचे दुष्परिणाम लक्षात येत नाहीत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.