Anushka Tapshalkar
शॅम्पूनंतर केस स्वच्छ आणि मऊ वाटतात, त्यामुळे लगेचच तेल लावण्याची सवय अनेकांना असते. पण ही सवय तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी योग्य नसू शकते!
शॅम्पूनंतर केस पाण्याने पूर्ण भिजलेले असतात. अशा वेळी लावलेलं तेल केसांच्या आत शोषलं जात नाही आणि फक्त वर राहून केस चिकट वाटू लागतात.
ओल्या केसांवर तेल लावल्याने केस चांगले दिसण्याऐवजी चिपचिपीत आणि निस्तेज वाटतात. यामुळे स्टायलिंग करायलही त्रास होतो.
शॅम्पूनंतर टाळू शुद्ध झालेली असते. लगेच तेल लावल्यानं टाळूवर ओलावा अडकतो आणि बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे खाज, डॅंड्रफ होऊ शकतो.
तेलाने केसांवर एक थर तयार होतो. त्यामुळे लीव्ह-इन कंडिशनर, सिरम्स यांसारखी उत्पादने केसात शोषली जात नाहीत आणि त्यांचा फायदा मिळत नाही.
शॅम्पूनंतर लगेच तेल लावल्यास केसांना आवश्यक पोषण शोषायला वेळ मिळत नाही. त्यामुळे केस पूर्णपणे मॉइश्चराइज होण्याऐवजी तेलाने बंद होतात.
शॅम्पूनंतर केस सुकू द्या आणि मगच सौम्यपणे तेल लावा किंवा शॅम्पूच्या काही तास आधी तेल लावून ठेवा. हे अधिक फायदेशीर ठरेल!