Anushka Tapshalkar
जितक्या लहान वयात सिगारेट सुरू होते, तितका शरीरावर आणि आरोग्यावर जास्त धोका वाढतो.
२५ वर्षांपूर्वी फुप्फुसे पूर्ण वाढलेली नसतात. त्यामुळे धूम्रपानाचा परिणाम अधिक गंभीर होतो.
तरुण वयात असामान्य वाटणारी लक्षणं दिसू लागतात, जसेकी थोडंसं चाललं तरी दम लागतो, थकवा जाणवतो.
धूम्रपानामुळे स्मरणशक्ती कमी होते, लक्ष एकाग्र होत नाही आणि स्ट्रेस वाढतो.
“कूल” वाटणारी सवय नकळत रोजची गरज बनते आणि व्यसन अधिक तीव्र होतं.
धूम्रपानामुळे दात पिवळे होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात आणि केस अकाली पांढरे होतात.
कॅन्सर, स्ट्रोक, हृदयविकार हे आजार पंचविशीतच उद्भवू शकतात.
मित्र म्हणाले तरी “चल बिडी मारूया” या मोहाला बळी पडू नका. धूम्रपानापासून दूर रहा.