Aarti Badade
ताक हे चविष्ट आणि शरीराला थंडावा देणारे असले तरी काही लोकांसाठी हे हानिकारक ठरू शकते.
ताकात मीठ घातल्याने त्यातील सोडियमचे प्रमाण वाढते, जे काही आजारांमध्ये अपायकारक असते.
हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनी ताकात मीठ घालून पिणे टाळावे. यामुळे रक्तदाब आणखीन वाढू शकतो.
किडनी स्टोन किंवा इतर किडनी समस्या असलेल्या व्यक्तींनी सोडियमयुक्त ताक टाळावे – यामुळे त्रास वाढू शकतो.
ताक हे काही वेळा अॅसिड रिफ्लक्स किंवा GERD ग्रस्त लोकांमध्ये पोटदुखी आणि जळजळ वाढवते.
ताकात मीठ घातल्याने काही लोकांना पोटदुखी, गॅस किंवा अन्ननलिकेला त्रास होऊ शकतो.
जर ताक पिण्याची इच्छा असेल, तर मीठ न घालता किंवा घरगुती मसाल्यांसह हलकं ताक प्यावं.