Aarti Badade
या बियांमध्ये लोह, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते.
कमकुवत हाडं किंवा हाडदुखी असलेल्या लोकांनी विशेषतः या बियांचे सेवन करावे.
भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
या बियांमध्ये झिंक, सेलेनियम व तांबे असल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.
भोपळ्याच्या बियांमध्ये दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
दररोज थोड्या प्रमाणात या बिया खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते.
भोपळ्याच्या बिया भाजून, किंवा स्मूदी, सॅलड, सूप मध्ये टाकून सहज खाऊ शकता.
हाडांसाठी, झोपेसाठी, रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाबासाठी – एकच नैसर्गिक उपाय!