सकाळ डिजिटल टीम
केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, बी, सी आणि बी 6 यांसारखे पोषक घटक असतात. केळी वजन कमी करण्यास मदत करते आणि आतड्यांसाठी फायदेशीर आहे.
केळी आणि दही एकत्र घेतल्याने अपचन, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते. दही हा आंबट आणि थंड पदार्थ आहे, जो केळी सोबत प्रतिक्रिया देतो, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
केळी खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या डाळी खाणे टाळावे.डाळीमध्ये पोषक घटक असले तरी, केळी सोबत त्यांचे सेवन पचनसंस्थेला त्रासदायक ठरू शकते.
केळी आणि चहा यांचे संयोजन वाईट असू शकते, आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
केळ्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. प्रत्येक केळीमध्ये १०५ कॅलोरीज, ३.१ ग्रॅम फायबर्स, आणि १.३ ग्रॅम प्रोटीन असतात.
केळी खाल्ल्यानंतर आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे.केळीचा पोषणतत्त्वांचा लाभ घेण्यासाठी त्यासोबत योग्य पदार्थांचा समावेश करा.