सकाळ डिजिटल टीम
एरंडेल तेल (Castor Oil) चे शरीराच्या विविध अवयवांवर अनेक फायदे आहेत. यामध्ये फॅटी अॅसिड आणि रिसिनोलिक अॅसिड असते, जे त्वचेसाठी, केसांसाठी आणि पचनासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
एरंडेल तेल चेहऱ्यावरील कोरडी त्वचा गुळगुळीत आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी प्रभावी आहे. १-२ थेंब एरंडेल तेलाचे बोटांवर पसरवून चेहऱ्यावर आणि मानेला लावा, याने डेड स्किन निघून त्वचा मऊ आणि चमकदार राहते.
चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी एरंडेल तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून लावल्यास फरक दिसतो. यामुळे डार्क सर्कल्स आणि पिग्मेंटेशन कमी होतात.
एरंडेल तेलापासून लिप बाम तयार करा. १ चमचा एरंडेल तेल, १ चमचा खोबरेल तेल आणि अर्धा चमचा कोरफड जेल एकत्र करून ओठांना लावल्यास ते हायड्रेटेड आणि गुलाबी राहतात.
एरंडेल तेल बॉडी मसाजसाठी उत्तम आहे.हे तेल शरीरातील वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असून, लॅव्हेंडर किंवा खोबरेल तेलासह मिसळून संपूर्ण शरीराला मसाज करता येतो.
एरंडेल तेल केसांच्या गळतीला थांबवण्यासाठी प्रभावी आहे. १ चमचा एरंडेल तेल आणि १ चमचा ऑलिव्ह तेल मिसळून संपूर्ण केसांना मसाज करा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांची वाढ प्रोत्साहित होते.
एरंडेल तेल चेहऱ्याला ग्लो देण्यास आणि सुरकुत्या, बारीक रेषा दूर करण्यास मदत करते. यासह चेहऱ्यावर नियमित मसाज केल्यास चेहरा तजेलदार आणि तरुण दिसतो.