Monika Shinde
टॉप कार्डिओलॉजिस्ट डॉ. नरेश त्रेहान यांनी अलीकडील 'अँजेंडाआज टक' इव्हेंटमध्ये दीर्घायुष्य टिकवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी काही महत्त्वाच्या लाइफस्टाइल टिप्स दिल्या.
सर्वांसाठी हृदयाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, आणि ते राखण्यासाठी काही साधे बदल आपल्याला आपल्या आहारात करावे लागतात.
पांढरे पदार्थ आपल्या आहारात जास्त प्रमाणात असताना ते हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात. चला, जाणून घेऊया कोणते ४ पांढरे पदार्थ
आहारात मिठाचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि किडनी समस्याचा सामना करावा लागतो. ते आपल्या शरीरातील पाणी जास्त प्रमाणात हृदयावर ताण आणते.
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास मधुमेह आणि हृदयाच्या इतर समस्यांना आमंत्रण देते.साखरेच्या प्रचंड सेवनामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
मैदामध्ये फायबर्स आणि पोषणतत्त्वांमध्ये कमी असतात. मैदाचे पदार्थ हे पचनासाठी देखील जड असतात. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
पांढऱ्या तांदळात फायबर्सची कमतरता असते आणि रक्तातील शर्करा पातळी वाढवू शकते. यामुळे मधुमेह आणि हृदयविकार होण्याची शक्यता असते.