पुजा बोनकिले
महिलांसाठी वैयक्तिक स्वच्छता खूप महत्वाची असते.
पण काही समान्य चुकांमुळे व्हजायनला इजा होऊ शकतो.
कोमट पाण्याने स्वच्छ करणे पुरेसे असल्याने महिलांनी इंटिमेट वॉश वापरणे टाळावे.
व्हजायनल केस तुम्ही थोडेसे ट्रिम करू शकता, परंतु ते पूर्णपणे काढून टाकू नका. असे केल्याने व्हजायना मार्गात बॅक्टेरियाचा धोका वाढू शकतो.
घट्ट कपडे घालल्याने व्हजायनाभोवती जास्त घाम येतो, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात.
जेव्हा तुम्ही ओले कपडे जसे की स्विमसूट किंवा ओले शॉर्ट्स जास्त वेळ घालता तेव्हा तुमच्या व्हजायनामध्ये बॅक्टेरिया वाढतात.
सुगंधित प्रोडक्ट वापरू नका. कारण ती तुमच्या योनीसाठी हानिकारक असू शकतात.