'या' नाश्त्याच्या चुकीच्या सवयी तुमच्या आरोग्यावर पडू शकतात भारी!

Anushka Tapshalkar

सकाळचा नाश्ता

नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. योग्य नाश्ता केल्यास ऊर्जा टिकते, पण चुकीचा नाश्ता केल्यास थकवा, मूड स्विंग्स आणि भूक वाढू शकते.

Morning Breakfast | sakal

'हेल्दी' वाटणारे पदार्थ पण...

काही पदार्थ हेल्दी वाटले तरी ते तुमचे हार्मोन्स आणि रक्तातील साखरेवर वाईट परिणाम करतात. ते टाळणं गरजेचं आहे.

The Breakfasts that are Ruining Your Health | sakal

दूधासोबत सिरीअल्स

प्रथिनं कमी, साखर जास्त! यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि थोड्याच वेळात थकवा जाणवतो.

Cereals and Milk | sakal

इंस्टंट ओट्स

ही झटपट पर्याय असले तरी यामध्ये पोषणद्रव्य कमी असतात. यामुळे साखरेचा त्वरित परिणाम होतो आणि नंतर क्रेव्हिंग्स वाढतात.

Instant Oats | sakal

चहा/कॉफी आणि बिस्किट

सकाळची हे कॉम्बिनेशन शरीराला काहीही पोषण देत नाही. यामुळे दिवसभर गोड खाण्याची इच्छा वाढते.

Tea/Coffee and Biscuits | sakal

फळांचा रस आणि टोस्ट

अतिशय कमी प्रथिनं आणि शून्य तंतू. फक्त साखर शरीरात जाते आणि काही वेळात परत भूक लागते.

Toast and Fruit Juice | sakal

रिफाइन्ड ब्रेड सॅंडविच

रिफाइन्ड ब्रेड व प्रोसेस्ड फिलिंग्समुळे शरीरात सूज, थकवा आणि ब्लड शुगर स्पाईक होतो.

Refined or Whitre Bread Sandwich | sakal

यापेक्षा चांगले पर्याय निवडा

घरचा ग्रॅनोला, ग्रीक योगर्ट, पीनट बटर टोस्ट, उकडलेली अंडी, रोल्ड ओट्स, चिया सीड्स, बदामाचं बटर आणि हंगामी फळं – हे पर्याय नाश्त्यासाठी अधिक संतुलित, पोषक आणि ऊर्जा देणारे आहेत.

Good and Healthy Options | sakal

महिलांच्या हार्मोनल असंतुलनावर उपायकारक खाद्यपदार्थ

Healthy food | Sakal
आणखी वाचा