Anushka Tapshalkar
या ऋतूमध्ये आर्द्रता, दूषित पाणी आणि जंतूंची वाढ यामुळे अन्नातून होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढतो. काही पदार्थ टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Monsoon Diet Care
sakal
पाणीपुरी, भेळ, चाट किंवा रस्त्यावरील भजी यामध्ये दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे टायफॉइड, जुलाब आणि पोटाचे संसर्ग होऊ शकतात.
Street Food
sakal
बाहेर विकली जाणारी आधीच कापलेली फळे लवकर खराब होतात. त्यावर जिवाणू वाढण्याची शक्यता अधिक असते.
Cut Fruits
पुरेशी स्वच्छता न केल्यास कच्च्या भाज्यांमधून हानिकारक जंतू शरीरात जाऊ शकतात. शक्यतो भाज्या शिजवून खा.
Salad
sakal
मेथी, पालक, लेट्यूस यांसारख्या पालेभाज्यांमध्ये माती, कीटक आणि जंतू अडकू शकतात. नीट धुवून आणि शिजवूनच सेवन करा.
Leafy Vegetables
sakal
पावसाळ्यात मासे आणि सीफूड लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे ते पूर्णपणे शिजवूनच खाणे सुरक्षित ठरते.
sakal
अधिक तेलकट पदार्थ पचनावर ताण आणू शकतात. तसेच योग्य तापमानात न ठेवलेले दूध, क्रीम किंवा मिठाई खराब होऊन पोटाचे विकार निर्माण करू शकतात.
Fried Food and Wrong Stored Dairy Products
sakal
ताजे शिजवलेले घरगुती अन्न, स्वच्छ पाणी, नीट धुतलेली फळे-भाज्या आणि गरमागरम जेवण यांना प्राधान्य द्या. आरोग्यदायी पावसाळ्यासाठी हीच सर्वोत्तम सवय!
Foods to Have in Monsoon
sakal
Health Benefits of Papaya Seeds
sakal