सकाळ डिजिटल टीम
चिया सीड्स अत्यंत पोषणयुक्त असतात. यामध्ये प्रोटीन, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्ससारख्या अनेक गुणधर्मांचा समावेश असतो. पण काही गोष्टींशी त्यांचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते.
चिया सीड्स जास्त साखर असलेल्या पदार्थांसोबत खाणे टाळा. जास्त साखरेमुळे कॅलोरीचे सेवन वाढते आणि ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होऊ शकते.
मीठ जास्त घेतल्यामुळे सोडियमचे सेवन वाढू शकते आणि ब्लड प्रेशर वाढू शकतो. साखरे प्रमाणेच जास्त मिठ असणाऱ्या पदार्थामध्ये चिया सीड्सचा समावेश करू नका.
चिया सीड्सला जास्त फॅट असलेले पदार्थ, जसे की लोणी किंवा तेला सोबत खाणे टाळा. यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यांचसोबत खाल्याने चिया सीड्सचा फायदाही कमी होतो.
चिया सीड्स सोबत मिरी, काळी मिरी, मसालेदार पदार्थ घालू नका. यामुळे पचनाची समस्यां उत्पन्न होऊ शकते, जसे की पोट दुखणे, अपचन, गॅस आणि जळजळ.
चिया सीड्स ड्रायफ्रूट्स किंवा दुसऱ्या कोणत्याही बियांच्या सोबत खाऊ नका. पोटातील पाणी कमी होते, ज्यामुळे पोट दुखणे आणि गॅस होणे त्याऐवजी, चिया सीड्स हे नेहमी भिजवून खावे.
आर्टिफिशियल स्वीटनर्स असलेल्या पदार्थांमध्ये चिया सीड्सचा समावेश करू नका, जसे की आइसक्रीम, स्मूदी इ. यामुळे पोटाच्या समस्या होऊ शकतात आणि ब्लड शुगर वाढू शकतो.
चिया सीड्स पॅकेज ज्यूस मध्ये भिजवून खाणे टाळा, कारण यामुळे शुगर इनटेक वाढू शकतो, जे डायबिटीज असलेल्या व्यक्तींना हानिकारक ठरू शकते.
चिया सीड्स किमान 20-30 मिनिटे पाणी किंवा दूध मध्ये भिजवून खा. यामुळे पचन अधिक सोपे होते आणि चिया सीड्सचा फायदा अधिक मिळतो.