सकाळ डिजिटल टीम
कैरीच्या सिझनमध्ये गुळांबा आणि साखरांबा ही पारंपरिक रेसिपी खूपच लोकप्रिय आहे. ही रेसिपी वर्षभरासाठी तयार केली जाऊ शकते.
3 कैऱ्या1.5 कप गूळ (चिरलेला),1/2 टीस्पून वेलची पावडर,चिमूटभर मीठ
कैरीची साल काढून, पातळ फोडी करा किंवा किसून घ्या.
गॅसवर पॅन गरम करून त्यात कैरी फोडी आणि गूळ घालून हलवून घ्या. गूळ पूर्णपणे विरघळवून घ्या.
गॅसवर मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत राहा. तसेच गुळाचा पाक घट्ट होईपर्यंत शिजवा.
गुळाचा पाक घट्ट झाल्यावर किंचित मीठ आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.
बोटांनी पाक चेक करा. साधारण तार आली की गॅस बंद करा. थोडं थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा.
गुळांबा बऱ्याच दिवसांपर्यंत टिकतो. मात्र, पाक जास्त घट्ट होऊ देऊ नका, अन्यथा गुळांबा कडक होईल.