सकाळ डिजिटल टीम
या कर्जावर व्याजदर खूप जास्त असतो आणि परतफेडीचा कालावधी कमी – त्यामुळे महिन्याच्या बजेटवर मोठा ताण येतो.
महागडे ईएमआय टाळा.मोठे हप्ते असलेल्या कर्जांमुळे दैनंदिन गरजा भागवताना अडचण येते.
कमाईचा विचार न करता अनावश्यक खर्च केल्यास, कर्ज वाढत जातं आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात.
क्रेडिट कार्ड व्याजदर खूप जास्त असतो . ३६ ते ४०% पर्यंत व्याज – वेळेवर भरणा न केल्यास व्याजाचा डोंगर तयार होतो!
क्रेडिट कार्ड किंवा कर्ज वेळेवर न फेडल्यास ते दुष्टचक्र बनते – त्यातून सुटका कठीण.
‘बीएनपीएल’ योजना आकर्षक वाटतात, पण त्याचे हप्ते तुमचे भविष्य गहाण ठेवू शकतात.
तरुण पिढीचा जास्त बळी नवीन नोकरी लागलेले किंवा खर्चात एकमेकांशी बरोबरी करणारे अनेकजण अशा सापळ्यात अडकतात.
संकट टाळायचे असेल तर नियोजन गरजेचे! कर्ज घेण्याआधी उत्पन्न, गरज, परतफेडीची क्षमता विचारात घ्या.