Aarti Badade
आंबा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्यासोबत काही पदार्थ खाल्ले तर शरीरावर उलट परिणाम होऊ शकतात.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोट फुगणे, अॅसिडिटी, अपचन आणि गॅसची तक्रार होऊ शकते. कमीत कमी 30 मिनिटांनी पाणी प्या.
आंबा गरम तर दही थंड; हे एकत्र खाल्ल्यास त्वचा व पचन तक्रारी होऊ शकतात.
आंबा व कोल्ड्रिंक्स दोन्हीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेषतः हे टाळावं.
कारल्यातील कडवटपणा आणि आंब्याची उष्णता एकत्र आल्यास अॅसिडिटी, मळमळ आणि श्वासाचा त्रास होऊ शकतो.
जास्त उष्णता वाढल्याने पिंपल्स, मुरुमं आणि त्वचेच्या तक्रारी दिसून येऊ शकतात.
फळांचा राजा असला तरी संयम आणि योग्य वेळेवर खाल्ल्यास आंब्याचे फायदे टिकून राहतात.