दुधासोबत हे कॉम्बो नकोच! एकत्र खाल्ले तर होऊ शकतो विषप्रभाव

Pranali Kodre

विरुद्ध आहार म्हणजे काय?

एकमेकांशी जुळणारे नसलेले अन्नपदार्थ एकाच वेळी खाल्ल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो. यालाच "विरुद्ध आहार" म्हणतात.

Food | Sakal

दूध आणि मासे – टाळा!

दूध आणि मासे एकत्र खाल्ल्यास त्वचेचे आजार आणि अपचन होऊ शकते.

Milk and Fish | Sakal

दूध आणि फळं – आरोग्यास अपायकारक

आंबट फळे आणि दूध एकत्र खाल्ल्यास पचन बिघडते आणि ऍसिडिटी होते.

Milk and Fruits | Sakal

दूध आणि मीठ – विषारी जोड

दुधात मीठ मिसळल्यास त्वचेचे विकार होतात आणि शरीरातील उष्णता वाढते.

Milk and Salt | Sakal

मध आणि तूप समप्रमाणात – टाळा!

मध आणि तूप समान प्रमाणात एकत्र खाल्ल्यास शरीरावर विषारी परिणाम होऊ शकतो.

Honey and Ghee | Sakal

गरम मध – आरोग्यास घातक

मध गरम केल्यास त्याचे पोषक गुणधर्म नष्ट होतात आणि तो विषारी बनू शकतो.

Honey | Sakal

दही आणि मध – चुकीचे संयोजन

दही आणि मध एकत्र खाल्ल्याने पचनास अडथळा येतो आणि त्वचेचे त्रास होऊ शकतात.

Honey and Curd | Sakal

खूप गरम आणि खूप थंड अन्न – एकत्र नको

उदाहरणार्थ, गरम पुरणपोळीसोबत थंड ताक खाणे. यामुळे शरीराचे संतुलन बिघडते आणि पचन खराब होऊ शकते.

Puranpoli | Sakal

ही भाकर नाही तर औषध आहे! वजन कमी करणाऱ्या 5 पारंपरिक पाककृती

Recipes for Weight Loss | Sakal
येथे क्लिक करा