गणपती घरी आणताना 'या' चुका टाळा

Mansi Khambe

गणेशोत्सव

भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी असून, या दिवसापासून गणपती बाप्पाचा उत्सव सुरू होणार आहे.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

बाप्पाचे आगमन

राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेकी घरात तसेच सार्वजनिक मंडळात बाप्पा विराजमान होतात.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

विशेष काळजी

गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना कोणती काळजी घ्यावी तसेच कोणत्या गोष्टी करू नये, याविषयीची सविस्तर जाणून घ्या…

Ganpati Sthapana at home

|

ESakal

धार्मिक मान्यता

धार्मिक मान्यतेनुसार, गणरायाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच घरात सुख, समृद्धी आणि शांती येते.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

पूजा करणे

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे विराजमान करण्यापूर्वी सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करून चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर अक्षता (तांदूळ) ठेवून बाप्पाची मूर्ती विराजमान करावी.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

संकल्प

त्यानंतर दिवा लावून पूजेचा संकल्प करावा. बाप्पाच्या मूर्तीला जानवे, हळद-कुंकू, अक्षता, अष्टगंध आणि लाल जास्वंदीचे फूल वाहावे. तसेच २१ दुर्वांची जुडी अर्पण करून २१ मोदक किंवा लाडूंचा नैवेद्यही दाखवावा.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

मूर्तीचा आकार

वास्तुशास्त्रानुसार, एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. तसेच मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असणे योग्य आहे.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

शरीरयष्टी

तसेच गणेशमूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे अयोग्य आहे. गणपतीची सोंड उजवीकडे नसावी.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

मूर्तीची रचना

मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी. कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. शिव-पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध असल्याचे शास्त्रात म्हटले आहे.

Ganpati Sthapana at home

|

ESakal

गणपतीची मूर्ती कशी असावी, शास्त्र काय सांगतं?

Ganesh idol Design

|

ESakal

येथे क्लिक करा