Mansi Khambe
“गणपती बाप्पा मोरया…” च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजरात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणरायाचे आगमन केले जाते.
Ganesh idol Design
ESakal
यंदाही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर रोजी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे घराघरात तसेच सार्वजनिक मंडपात आगमन केले जाणार आहे.
Ganesh idol Design
ESakal
गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस उरले असून बाप्पाच्या आगमनासाठी जय्यद तयारी केली जात असल्याचे दिसत आहे. मात्र गणपतीची मूर्ती कशी असावी? याबाबत शास्त्र काय सांगतं, ते जाणून घ्या.
Ganesh idol Design
ESakal
शास्त्रानुसार घरगुती गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची, बसलेली, सुबक आणि डाव्या सोंडेची असावी.
Ganesh idol Design
ESakal
घरगुती गणपतीची मूर्ती कमीत कमी ७ ते ९ इंच किंवा जास्तीत जास्त १ ते १.५ फूट असावी. तसेच बाप्पाची सोंड डाव्या बाजूला वळलेली असावी. कारण अशी मूर्ती सुख-समृद्धी आणि शांती देणारी मानली जाते.
Ganesh idol Design
ESakal
त्याचबरोबर गणेशाची मूर्ती एकदंत असावी, तसेच चतुर्भुज म्हणजेच चार हात असलेली असावी. यामध्ये हातांचे आभूषणात एका हातात मोदक, दुसरा हात आशीर्वाद देणारा, आणि इतर हातात पाश व अंकुश असावा.
Ganesh idol Design
ESakal
वास्तूशास्त्रानुसार, गणपतीच्या मूर्तीची स्थापना घराच्या ईशान्य कोण म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला स्थापित करावी. याठिकाणी रिक्त जागा उपलब्ध नसेल तर पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला स्थापित करू शकता.
Ganesh idol Design
ESakal
वरील सर्व माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहे. 'सकाळ' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.
Ganesh idol Design
ESakal
Red Carpet History
ESakal