Aarti Badade
दररोज एकाच वेळी झोपा. हे तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात मदत करेल.
सकाळी व्यायाम केल्याने रात्री चांगली आणि गाढ झोप येते. योगासने किंवा प्राणायामही झोप सुधारतात.
रात्री शांत आणि गाढ झोपेसाठी बेडरूमचे तापमान थोडं थंड ठेवा. थंड वातावरण झोपेसाठी योग्य असतं.
चहा, कॉफी किंवा अल्कोहोल यांचे रात्री सेवन टाळा. यांच्या सेवनाने झोपेमध्ये अडथळे येऊ शकतात.
रात्री जास्त जेवण टाळा. हलके आणि पचायला सोपे जेवण करा, जेणेकरून झोपेवर परिणाम होणार नाही.
झोपण्यापूर्वी ताण कमी करण्यासाठी आराम करा. डायरी लिहा, चांगले संगीत ऐका किंवा श्वास घ्या.
झोपण्यापूर्वी आंघोळ करा. हे तुमच्या शरीर आणि मनाला शांत करतं, ज्यामुळे चांगली झोप येते.