Aarti Badade
पावसाळ्यात कलिंगड खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे जिवाणू आणि विषाणूंची वाढ होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे अन्नातून विषबाधा किंवा इतर संसर्ग होऊ शकतो.
या काळात आपली पचनशक्ती कमजोर होते. कलिंगडसारखे जास्त पाणी असलेले आणि थंड फळ खाल्ल्यास अपचन, ऍलर्जी, जुलाब किंवा पोटदुखी होऊ शकते.
हवेतील आर्द्रतेमुळे जिवाणू-विषाणूंची वाढ होते. कलिंगड कापून ठेवल्यास किंवा जास्त वेळ बाहेर ठेवल्यास ते दूषित होण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कलिंगड पचनास जड असल्याने शरीरावर ताण येऊ शकतो आणि आरोग्य बिघडू शकते.
काहीवेळा कलिंगडमध्ये जास्त प्रमाणात नायट्रेट्स असू शकतात, ज्यामुळे समस्या उद्भवतात. तसेच, कापलेले कलिंगड जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते विषारी होऊ शकते.
पावसाळ्यात कलिंगड आणि इतर जास्त पाणी असलेली फळे खाणे टाळा. फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि कापलेली फळे जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
पावसाळ्यात शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळा, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.