सकाळ डिजिटल टीम
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्या करणार आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ यावेळी आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यावर्षी देखील आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळेल.
२६.७५ कोटींमध्ये करारबद्ध केलेल्या श्रेयस अय्यरवर पंजाब किंग्जने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई रणजी संघाचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करणार आहे.
दिल्लीचा माजी कर्णधार ऋषभ पंतला यावेळी लखनौ सुपर जायंट्स संघाने कर्णधार म्हणून निवडले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता उपकर्णधार शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाची धुरा सांभाळेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने कर्णधारपदी रजत पाटीदारची नियुक्ती केली आहे.
भारतीय सलामीवीर संजू सॅमसनवर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची जबाबदारी असेल.
तर स्पर्धेला अवघे ९ दिवस शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदी अष्टपैलू अक्षर पटेलची निवड केली आहे.