सकाळ डिजिटल टीम
दिल्लीने करारबद्ध केलेला इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रुकने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.
ब्रुकने लीगमधून अचानक माघार घेतल्यामुळे त्याच्यावर नवीन नियमानुसार दोन वर्षांसाठी बंदी घातली जावू शकते.
मुंबई इंडियन्सने संघात करारबद्ध केलेला अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अल्लाह गझनफरने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
त्याच्या जागी अफगाणिस्तानच्या मुजिब उर रहमानला मुंबईने संघात करारबद्ध केले आहे.
दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज लिझाद विल्यम देखील यावेळी दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे.
त्याच्या जागी मुंबईने कॉर्बिन बॉशला संघात सामिल केले आहे.
त्याचबरोबर इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्सने लीगमधून माघार घेतल्यामुळे सनरायझर्स हैद्राबादला धक्का बसला आहे.
हैद्राबादने ब्रायडनच्या जागी वेगवान गोलंदाज विवान मुल्डरला संघात करारबद्ध केले आहे.