शरीराचे तुटलेले अवयव पुन्हा वाढवणारा अनोखा प्राणी

संतोष कानडे

अ‍ॅक्सोलॉटल

अ‍ॅक्सोलॉटल हा मेक्सिकोमध्ये आढळणारा सॅलॅमँडर या उभयचर प्राण्यांचा एक प्रकार आहे.

झोचिमिल्को

हा प्रामुख्याने मेक्सिको सिटीमधील झोचिमिल्को परिसरातील गोड्या पाण्यात आढळतो.

अवयव

या प्राण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शरीराचे तुटलेले किंवा नष्ट झालेले काही अवयव पुन्हा वाढवण्याची क्षमता.

हृदय

तो आपले पाय, शेपटी, पाठीचा कणा आणि हृदय व मेंदूच्या काही ऊती पुन्हा निर्माण करू शकतो.

अळी

विशेष म्हणजे, प्रौढ झाल्यानंतरही तो अळीसारखे दिसणारे शरीराचे स्वरूप कायम ठेवतो.

अळी

शरीराचे स्वरूप

त्याच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना पिसांसारख्या दिसणाऱ्या बाह्य कल्ल्यांच्या तीन जोड्या असतात.

ऑक्सिजन

हे कल्ले पाण्यातून ऑक्सिजन शोषून घेण्यास मदत करतात.

किडे

अ‍ॅक्सोलॉटल लहान मासे, किडे, कृमी आणि इतर जलचर प्राणी खातो.

अधिवास

प्रदूषण, अधिवासाचा ऱ्हास आणि परदेशी माशांच्या वाढत्या संख्येमुळे त्याचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे.

निसर्ग संवर्धन

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या वर्गीकरणानुसार अ‍ॅक्सोलॉटल हा अत्यंत संकटग्रस्त प्राणी आहे.

औरंगजेबाच्या जनानखान्यात किती महिला राहत होत्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>