संतोष कानडे
मुघल बादशहांच्या राजवाड्यातील पत्नी, बेगम, राजघराण्यातील महिला, दासी आणि सेविका यांच्या निवासासाठी असलेल्या स्वतंत्र विभागाला जनानखाना म्हणत.
काही ऐतिहासिक संदर्भांनुसार औरंगजेबाच्या जनानखान्यात सुमारे 2000 महिला सेविका कार्यरत होत्या.
जनानखान्यात केवळ बादशहाच्या पत्नी किंवा बेगम राहत नव्हत्या, तर त्याच्या कुटुंबातील इतर महिलांचाही समावेश होता.
यामध्ये राजकन्या, नातेवाईक महिला, दासी, सेविका आणि इतर कर्मचारी यांचा समावेश होता.
जनानखाना हा केवळ बादशहाच्या खासगी जीवनाशी संबंधित भाग नव्हता, तर त्याची स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्थाही होती.
महिलांच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ महिला अधिकारी नियुक्त केल्या जात असत.
जनानखान्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी महिला रक्षक आणि खोजे तैनात असत.
औरंगजेबाच्या पत्नी दिलरास बानू आणि रहमत-उन-निसा यांसारख्या महिलांना राजकीय आणि कौटुंबिक निर्णयांमध्येही महत्त्व होते.
इतिहासकार मुनिस डी. फारुकी यांच्या संशोधनानुसार औरंगजेबाच्या जनानखान्यातील वरिष्ठ महिलांचा त्याच्या राजकीय मोहिमांनाही पाठिंबा होता.
त्यामुळे जनानखाना म्हणजे केवळ ऐषआरामाची जागा नसून मुघल सत्तेच्या कौटुंबिक आणि राजकीय व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होता.