संतोष कानडे
इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचं २८ फेब्रुवारी रोजी निधन झालं.
या घटनेचा थेट परिणाम उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात पाहायला मिळला.
बाराबंकी जिल्ह्यातील सिरौली गौसपुर तहसीलमध्ये असलेल्या 'किंतूर' गावात सध्या शोकाकूल वातावरण आहे.
अयातुल्ला खामेनेई यांच्या पूर्वजांचे या गावाशी खास कनेक्शन होतं. त्यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हे १८-१९ व्या शतकात याच किंतूर गावात वास्तव्यास होते.
आपल्या भारतीय मुळांचा सन्मान राखण्यासाठीच त्यांच्या कुटुंबाने आपल्या नावापुढे 'हिंदी' हे उपनाम जोडले होते.
आजही या गावात खामेनेई यांच्या कुटुंबाशी संबंधित जुनी कागदपत्रे आणि त्यांचे जुने घर अस्तित्वात आहे, जे या ऐतिहासिक संबंधांची साक्ष देतात.
किंतूर गावात राहणारे त्यांचे वंशज सय्यद निहाल मिया यांनी अत्यंत भावूक होऊन आपली प्रतिक्रिया दिली होती.
भारतातील अनेक मुस्लिमांनी खामेनेई यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला. सोशल मीडियात हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
सध्या इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्तपणे कारवाई करत त्यांचे अनेक महत्त्वाचे नेते आणि तळं उद्ध्वस्त केली आहेत.