संतोष कानडे
भारताकडे असलेला कोहिनूर हिरा १७३९ मध्ये इराणने पळवला होता. त्याची कथा इंटरेस्टिंग आहे.
तत्कालिन इराणचा शासक नादिर शाह याने भारतावर आक्रमण केलं होतं. त्याने लुटीत दिल्लीतलं मयूर सिंहासह आणि कोहिनूर हिरा पळवला होता.
कोहिनूर हिरा आंध्र प्रदेशातील गोवळकोंडा खाणीतून निघाला होता. आधी तो अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर मुघलांकडे गेला.
नादिर शाहनंतर हा हिरा अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दालीकडे गेला. पुढे त्याचा वंशज शाह शुजा याने हा हिरा पुन्हा भारतात महाराजा रणजित सिंह यांना भेट दिला.
१८४९ मध्ये दुसऱ्या शिख-अँग्लो युद्धात पंजाबवर ब्रिटिशांनी ताबा मिळवला तेव्हा महाराज दलीप सिंह यांच्याकडून ब्रिटिशांनी लाहोरच्या तहानुसार हा हिरा ताब्यात घेतला.
सध्या हा कोहिनूर हिरा यूकेच्या ताब्यात आहे. लंडनमधल्या टॉवर ऑफ लंडन येथील संग्रहालयात तो ठेवलेलाय.
हा कोहिनूर हिरा ब्रिटनने राजघराण्याच्या शाही मुकूटाचा भाग म्हणून जतन करुन ठेवण्यात आलेला आहे.
म्हणजे ब्रिटिशांपूर्वीही कोहिनूर हिरा इराणचा शासक नादिरशाहने पळवला होता, हा इतिहास आहे.