सकाळ डिजिटल टीम
एक काळ असा होता जेव्हा आयेशा टाकियाच्या सौंदर्याची आणि सिनेमांची जोरदार चर्चा होत होती.
आयेशा टाकिया 'वॉन्टेड' सारख्या हिट सिनेमांमुळे प्रसिद्ध झाली.
आयेशा अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही, पण तरीही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आयेशा हिने 23 वयातच उद्योजक फरहान आझमीसोबत लग्न केलं, आणि त्यांचा विवाह 1 मे 2009 रोजी झाला.
आयेशा आणि फरहान अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते, आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आयेशा आणि फरहान यांना एक मुलगा आहे, ज्याचं नाव मिखाइल आझमी आहे.
आयेशा टाकिया सपा आमदार अबू आझमी यांची यांची सून आहे.
त्यांनी औरंगजेबाचे उदातीकरण करणारे वक्तव्य केले. यानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली. या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत.
आयेशा हिने मॉडेल म्हणून आपल्या करीयरची सुरुवात केली आणि 2004 मध्ये 'टार्झन द वंडर कार' सिनेमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आयेशा टाकिया 'टार्झन: द वंडर कार', 'वॉन्टेड', आणि 'दिल मांगे मोर' सारख्या सिनेमांमध्ये दिसली.
अबू आझमी यांची सून असूनही आयेशा टाकियाने त्यांच्या आजवरच्या अनेक वादग्रस्त विधानांवर टीका केली आहे.