अयोध्या रामजन्मभूमी परिसरात कोरियन राणीचा पुतळा कसा काय? इतिहासात दडलेलं रहस्यमय कारण पाहा

Saisimran Ghashi

अयोध्येत कोरियन राणीचा पुतळा

अयोध्येत कोरियन राणीचा पुतळा उभारण्यात आला.. पण हे कसे काय झाले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर आज आम्ही याचे उत्तर देणार आहे

Legend of Queen Heo Hwang-ok and Her Ayodhya Origins

|

esakal

राणीची ओळख

अयोध्येतून कोरियाला गेलेली राजकन्या सुरिरत्ना ही हेओ ह्वांग-ओक म्हणून ओळखली जाते, जी कोरियन इतिहासातील प्रसिद्ध राणी आहे.

Unveiling of the korea queen Bronze Statue in Ayodhya

|

esakal

अयोध्येशी संबंध

रामजन्मभूमी परिसरात हेओ ह्वांग-ओकचा पुतळा उभारण्यात आला असून, तिचे जन्मस्थान अयोध्या असल्याचे लोककथा सांगतात.

Historical References in Samguk Yusa

|

esakal

ऐतिहासिक कथा

इ.स. ४८ मध्ये १६ वर्षांच्या वयात सुरिरत्नाने समुद्रमार्गे कोरियाला प्रवास केला आणि राजा किम सुरोशी विवाह केला

king kimsuro korea

|

esakal

बौद्ध धर्माचा प्रसार

कोरियात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे श्रेय हेओ ह्वांग-ओकला दिले जाते, ज्यामुळे तिचा सांस्कृतिक वारसा महत्त्वपूर्ण आहे.

The Queen Heo Hwang-ok Memorial Park

|

esakal

समगुक युसा ग्रंथ

१३ व्या शतकातील कोरियन ग्रंथ समगुक युसा मध्ये तिच्या जन्मभूमीचा उल्लेख 'आयुता' म्हणून आहे, ज्याचा अर्थ अयोध्या असल्याचे मानले जाते.

Cultural and Diplomatic Ties Between India and South Korea

|

esakal

इतिहासकारांचे मत

कोरियन मानववंशशास्त्रज्ञ किम ब्युंग-मो यांच्या मते, हेओ ह्वांग-ओकचा भारत आणि अयोध्येशी संबंध सांस्कृतिक स्मृती आहे, परंतु इतर ग्रंथात उल्लेख नसल्याने वाद आहे.

Heo Hwang-o Princess Suriratna tomb

|

esakal

भारतीय संदर्भ

भारतीय प्राचीन साहित्यात तिचा थेट उल्लेख नाही, पण कथेनुसार ती राजा पद्मसेन आणि राणी इंदुमती यांची कन्या असून स्वप्नामुळे कोरियाला पाठवली गेली.

queen padmasen and queen indumati

|

esakal

वारसा आणि वंशज

दक्षिण कोरियातील सुमारे सहा दशलक्ष लोक स्वतःला तिचे वंशज मानतात, ज्यात गिम्हे किम, हेओ आणि ली कुळे समाविष्ट असून, काही राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे.

Heo Hwang-o Princess Suriratna Legacy and Descendants in Modern Korea

|

esakal

स्मारकाची उभारणी

२००० साली अयोध्या आणि गिम्हे सिस्टर सिटीज झाले, २०१८ मध्ये MoU द्वारे स्मारक विकसित झाले असून, त्यात पुतळे, तलाव आणि सुवर्ण अंड्याचे शिल्प आहे.

Debates on Historical Authenticity about Heo Hwang-o Princess Suriratna

|

esakal

ऐतिहासिक सत्यता

तिचे भारतीय मूळ वादग्रस्त असून, काहींच्या मते ती थायलंड, दक्षिण भारत किंवा मध्य आशियातील असावी, DNA चाचणी अनिर्णायक असल्याने कथा दंतकथा म्हणून मानली जाते.

Heo Hwang-o Princess Suriratna history

|

esakal

मुघलांचे वंशज आता कुठे आहेत अन् काय करतात?

mughal descendants India | esakal
येथे क्लिक करा