आयुर्वेदात सांगितलेले साखरेचे पाच फायदे कोणते?

संतोष कानडे

साखर

साखर नैसर्गिकरित्या थंड असल्यामुळे शरीरातील वाढलेले पित्त, छातीतील जळजळ आणि ॲसिडिटी कमी करते.

थकवा

अतिश्रमामुळे थकवा किंवा ग्लानी आली असल्यास, साखरेचे पाणी शरीराला त्वरित ऊर्जा देऊन थकवा दूर करते.

उष्णता

शरीरात उष्णता वाढून हात-पायांची जळजळ होत असल्यास खडीसाखर खाण्याने शरीराला थंडावा मिळतो.

रक्तपित्त

नाकातून रक्त येणे (नळ सुटणे) अशा रक्तपित्ताच्या त्रासामध्ये खडीसाखर औषधासारखे काम करते.

रोगप्रतिकारक शक्ती

उत्तम दर्जाची शर्करा शरीरातील धातू वाढवून ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते.

प्रमाण

हे जसे साखरेचे फायदे आयुर्वेदात सांगितलेले आहेत, तसे तोटीही सांगितले आहेत. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात कफ आणि मेद (चरबी) वाढू लागते.

लिव्हर

साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेह (डायबिटिस), यकृताचे (लिव्हर) आजार आणि पचनक्रिया मंदावण्याचा धोका असतो.

रिफाइंड साखर

आजकाल बाजारात मिळणारी पांढरी रिफाइंड साखर केमिकल वापरून बनवली जाते, जी शरीराला फक्त आजार देते.

खडीसाखर

त्यामुळे साखरेचा फायदा हवा असल्यास पांढऱ्या साखरेऐवजी धागा असलेली खडीसाखर, सेंद्रिय गूळ किंवा मध यांचा मर्यादित वापर करावा.

मधुमेह

मात्र ज्यांना मधुमेहाचा आजार नाही, त्यांनीच साखर आणि साखरेचे पदार्थ सेवन करावेत. बाकी साखर नाही घेतली तर उत्तमच आहे.

ऑरा कसा डेव्हलप करतात? तो कसं काम करतो?

<strong>येथे क्लिक करा</strong>