सकाळ डिजिटल टीम
एरंड हे औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. तसेच याला आयुर्वेदात देखील महत्वाचे स्थान आहे.
एरंडाचे आयुर्वेदीक महत्व काय आहे आणि त्याचे कोणते फायदे आहेत जाणून घ्या.
एरंड हे वात-नाशक आहे, त्यामुळे वात-दोषामुळे होणारे आजार जसे की सांधेदुखी, स्नायू दुखणे कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
एरंडेल तेल हे नैसर्गिक रेचक आहे, जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते.
एरंडाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सूज आणि वेदना कमी हे फायदेशीर मानले जाते.
त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी आणि कोरडी त्वचा, खाज आणि ऍलर्जी सारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
केसांच्या वाढीसाठी आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त मानले जाते.
एरंड्याचा उपयोग खोकला, दमा, संधिवात, मूळव्याध, पोटाचे विकार आणि ताप यांसारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी ही केला जोतो.
एरंडाचा वापर करण्यापूर्वी, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.