Yashwant Kshirsagar
शिलाजीत हे फक्त पुरुषांसाठीच नाही तर महिलांच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार शिलाजीत असे रसायन आहे, जे महिलांची शक्ती आणि उर्जा वाढविण्यास मदत करते.
अनियमित मासिक पाळी, पीसीओडी, आणि मेनोपॉजची समस्या कमी करण्यास हे मदत करते. शिलाजीत महिलांचे हार्मोन्स संतुलित करण्यासाठी एक नैसर्गिक औषधी म्हणून उपयोगी आहे.
शिलाजीतच्या सेवनामुळे शरीरातील कमजोरी आणि थकवा दूर होतो आणि शरीराला नवी उर्जा मिळते. यामधील अॅंटी ऑक्सीडेंट त्वचेवरील सुरकुत्या कमी करते
शिलाजीतमधील कॅल्शियम आणि मिनरल्समुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
महिलांनी सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात शिलाजीतचे सेवन केले पाहिजे. त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजचे आहे.
गर्भवती आणि स्ननपान करणाऱ्या महिलांनी तसेच हार्मोनल आजार असलेल्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शिलाजीतचे सेवन करु नये.
हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वरील गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.