फक्त सिंधुदुर्गातच नाहीत तर महाराष्ट्रातील या ठिकाणीही आहेत शिवरायांची मंदिरे, काय आहे इतिहास

Yashwant Kshirsagar

स्फूर्तीस्थळे

स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित अनेक स्फूर्तिस्थळ देशभरात पाहायला मिळतात पण त्यांची मोजकीच मंदिरे महाराष्ट्रात आणि देशात आहेत.

Shivaji Maharaj temples, | esakal

शिवरायांची मंदिरे

छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात हातावर मोजण्याएवढीच मंदिरे आहेत. यातील दोन तर राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी बांधली आहेत.

Shivaji Maharaj temples, | esakal

राजर्षि शाहू महाराज

सिंधुदुर्ग किल्ल्यामधील श्रीशिवराजेश्‍वर मंदिरानंतर जवळपास २१५ वर्षांनी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी शिवरायांची दोन मंदिरे बांधली.

Shivaji Maharaj temples, | esakal

मंदिरांचे बांधकाम

एक पन्हाळगडावर आणि दुसरे कोल्हापुरातील नर्सरी बागेत. (साधारण १९१० मध्ये). ही मंदिरे आधुनिक काळातील शिवरायांची पहिली दोन मंदिरे आहेत.

Shivaji Maharaj temples, | esakal

रांजणी सैनिक

एखाद्या गावाने मिळून सार्वजनिकरीत्या बांधलेले शिवरायांचे मंदिर सांगली जिल्ह्यातील रांजणी सैनिक (ता. कवठेमहांकाळ) येथील असावे

Shivaji Maharaj temples, | esakal

पन्हाळा

एक पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी बांधले आहे. या मंदिरात असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची साधारण 1.5 ते 2 फुट संगमरवरातील अश्वारूढ मूर्ती आहे.

Shivaji Maharaj temples, | esakal

नर्सरी बाग

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे मंदिर कोल्हापूरमधील नर्सरी बाग येथे बांधले. या मंदिराची देखभाल आजही घाटगे कुटुंबाकडे आहे.

Shivaji Maharaj temples, | esakal

शिवाजी महाराजांच्या 'या' योजनेमुळे महाराष्ट्रातल्या नापीक जमिनी पिकाऊ झाल्या

Shivaji Maharaja's Agricultural Policies | sakal
येथे क्लिक करा