Anushka Tapshalkar
ब्रह्ममुहूर्त किंवा पहाटे १–२ ग्लास कोमट पाणी प्यावे. हे आतड्यांना सक्रिय करते आणि पचनशक्ती संतुलित ठेवते. रात्रभर शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडतात.
Lukewarm Water After Waking Up in the Morning
sakal
फक्त तहान लागल्यावरच पाणी प्या. पाणी शांतपणे, बसून आणि हळूहळू घोट घेत प्या. खूप थंड पाणी पिणे टाळा कारण ते पचनशक्ती कमी करते.
How to Drink Water During the Day
sakal
जेवणाच्या साधारण एक तास आधी थोडेसे कोमट पाणी प्यावे. हे पचनासाठी मार्ग मोकळा करते आणि जठराग्नि संतुलित ठेवते. परंतु, खूप पाणी प्यायल्यास भूक कमी होऊ शकते आणि पचनशक्ती कमी होऊ शकते.
Drinking Water Before Meal
sakal
जेवताना पाणी पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक नाही, परंतु ते मर्यादित प्रमाणातच प्यावे. जेवताना जास्त पाणी प्यायल्यास जठराग्नि कमी होते आणि पचन नीट होत नाही. गळा किंवा तोंड कोरडे वाटल्यास फक्त १–२ छोटे घोट कोमट पाणी प्यावे, ज्यामुळे पचनास मदत होते.
Drunking Water While Having Meal
sakal
जेवणानंतर त्वरित पाणी पिणे टाळावे, कारण ते विषासारखे परिणाम करू शकते. ९० मिनिटांनंतर पाणी प्यायल्यास ते औषधासारखे फायदेशीर ठरते. या वेळी पचन प्रक्रिया स्थिर अवस्थेत पोहोचलेली असते.
Drinking Water After Meals
sakal
सूर्यास्तानंतर पाणी कमी प्यावे. खूप थंड पाणी आणि वारंवार पाणी पिणे टाळावे. यामुळे कफ वाढणे, सूज येणे आणि रात्रीची सुस्ती टाळता येते.
Less Water in Evening and Night
sakal
झोपण्याच्या १ तास आधी शेवटचे पाणी प्यावे. यामुळे चांगली झोप लागते आणि वारंवार लघवीला जाण्याची समस्या कमी होते. किडनी आणि हृदयावर अनावश्यक ताण येत नाही.
Before Going to Bed At Night
sakal
How to Identify Doshas in Body
sakal