Tulsi Kadha Benefits : पावसाळ्यात तुळशीचा काढा पिण्याचे 'हे' फायदे ऐकून तुम्हीही लगेच सुरू कराल सेवन!

सकाळ डिजिटल टीम

तुळशीचा काढा पिल्यावर होतात 'हे' चमत्कार

पावसाळा सुरू झाला की सर्दी, ताप, पोटदुखी, डोकेदुखी अशा अनेक तक्रारी वाढतात. या हंगामात शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचा काढा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया, पावसाळ्यात तुळशीचा काढा पिण्याचे महत्त्वाचे फायदे.

Tulsi Kadha Benefits | esakal

पौष्टिक घटकांनी समृद्ध

तुळशीच्या काढ्यात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. हे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-तापासारख्या आजारांपासून संरक्षण करतात.

Tulsi Kadha Benefits | esakal

डोकेदुखीपासून आराम

तुळशीच्या काढ्याचे नियमित सेवन केल्याने डोकेदुखी व मानसिक ताण कमी होतो. काढ्यातील नैसर्गिक घटक मज्जासंस्थेला शांती देतात व ताणतणाव कमी करण्यास मदत करतात.

Tulsi Kadha Benefits | esakal

पचन सुधारते

फायबरयुक्त तुळशीचा काढा पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. तो बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्यांवर उपाय करतो, तसेच पोट हलके व आरामदायी ठेवतो.

Tulsi Kadha Benefits | esakal

वजन नियंत्रणात ठेवते

तुळशीचा काढा चयापचय वेगवान करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. नियमित सेवनामुळे वजन नियंत्रणात राहते व शरीर तंदुरुस्त दिसते.

Tulsi Kadha Benefits | esakal

तोंडाचा दुर्गंध दूर करतो

तुळशीमध्ये नैसर्गिक ताजेतवानेपणा देणारे गुण असतात. तुळशीचा काढा किंवा चहा पिल्याने तोंडाचा दुर्गंध दूर होतो व तोंडात ताजेपणा जाणवतो.

Tulsi Kadha Benefits | esakal

...तर तुळशीचा काढा ठरेल सर्वोत्तम उपाय!

पावसाळ्यात तुळशीचा काढा हा घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे जो रोगांपासून संरक्षण देतो तसेच शरीराला तंदुरुस्त ठेवतो. दररोज किंवा आठवड्यातून काही वेळा हा काढा पिण्याने तुम्ही निरोगी राहू शकता.

Tulsi Kadha Benefits | esakal

दररोज बकरीचे तूप खाल्ल्यावर शरीरात घडतात 'हे' चमत्कार; जाणून घ्या तुपाचे अचंबित करणारे फायदे!

Goat Ghee Benefits | esakal
येथे क्लिक करा...