सकाळ डिजिटल टीम
ब्राह्मी या औषधी वनस्पतीचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
ब्राह्मी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचे कोण-कोणते फायदे आहेत जाणून घ्या.
ब्राह्मी मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरची क्रिया सुधारून स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते.
ब्राह्मी कोर्टिसोलची पातळी कमी करून तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते.
ब्राह्मीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर मानली जाते.
ब्राह्मी जठरासंबंधी व्रण बरे करण्यास आणि पचनास मदत करते.
ब्राह्मी त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि त्वचेला पोषण देण्यासाठी देखील वापरली जाते.
ब्राह्मी ही वनस्पती केस गळणे कमी करते आणि केसांच्या वाढीसाठी चांगली मानली जाते.
गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी ब्राह्मी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.