Anushka Tapshalkar
गुढीपाडवा हा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा सण असून, या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ यांचे सेवन करण्याची परंपरा आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, जिरे, हिंग आणि थोडेसे मीठ एकत्र वाटून मिश्रण तयार केले जाते आणि त्याचे सेवन केले जाते.
आयुर्वेदानुसार, कडुलिंब शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कडुलिंब सेवनाचे काही महत्त्वाचे फायदे जाणून घेऊया:
कडुलिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी करतात.
कडुलिंबातील औषधी गुणधर्म अपचन, गॅस, आणि आम्लपित्त कमी करण्यात मदत करतात.
कडुलिंब रक्तशुद्ध करणारे आहे. त्यामुळे त्वचेवरील मुरूम, कोरडी त्वचा आणि अॅलर्जी कमी होते.
कडुलिंबातील घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.
कडुलिंब नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. त्यामुळे यकृताचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
आयुर्वेदानुसार, कडुलिंब मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करते. त्यामुळे गुढीपाडव्याला त्याचे सेवन शुभ मानले जाते.