Anushka Tapshalkar
प्रोबायोटिक ड्रिंक्स आणि डिटॉक्स टी ट्रेंड होण्याआधीच आयुर्वेदाने योग्य आहाराचे महत्त्व सांगितले आहे. चुकीचा आहार पचन मंदावतो, फुगणे आणि बद्धकोष्ठता वाढवतो.
रिफाइंड धान्य पचनासाठी जड ठरतात. ब्राऊन राईस, ज्वारी, बाजरी, नाचणी यामध्ये फायबर भरपूर असल्याने पचन सुधारते आणि पोट हलके राहते.
आजच्या डेअरीमुळे अनेकांना गॅस आणि फुगण्याचा त्रास होतो. बदाम दूध, नारळ दूध किंवा सोया दूध पचनासाठी अधिक हलके आणि सोपे असतात.
आयुर्वेदानुसार योग्य चरबी पचनाग्नी मजबूत करते. तूप पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पोषक घटकांचे शोषण वाढवते.
चिप्स, बिस्किटे पचन बिघडवतात. मूग डाळ, चणा, राजमा तसेच पालेभाज्या, भेंडी, कारले यामुळे पचन नियमित राहते.
हळूहळू आहारात बदल करा. आठवड्यात काही वेळा मिलेट्स, तूप आणि डाळी वापरल्याने पोटाच्या तक्रारी कमी होतात.
आयुर्वेद-मान्य अन्न निवडा, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा आणि शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळणारा आहार घ्या.
Sesame Seeds Have More Calcium than Milk
sakal