सकाळ डिजिटल टीम
अनेक घरांमध्ये दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही पण आयुर्वेदात या साध्या भाजीला आरोग्यासाठी संजीवनी मानले गेले आहे.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असून व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B, पोटॅशियम, कॅल्शियम अन् आयर्न यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
आयुर्वेदानुसार दुधी भोपळा प्रकृतीने अत्यंत थंड अन् हायड्रेटिंग असल्याने शरीरातील वात आणि पित्त दोषांचे संतुलन राखण्यास मदत करतो.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
यातील फायबर पचनक्रिया सुरळीत करून अपचनाचा त्रास घालवते; तर कमी कॅलरीजमुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम आहार ठरतो.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
दुधीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयाचे विविध आजारांपासून संरक्षण करते.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे दुधी भोपळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतो; शिवाय शरीरातील अतिरिक्त उष्णता अन् त्वचेची जळजळ कमी करतो.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
दह्याची आम्लता कमी करण्यासाठी दुधीच्या रायत्यात भाजलेले जिरे, हिंग, सैंधव मीठ अन् थोडे तूप वापरून पाचक रायते बनवावे.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
दुधीचे कोफ्ते तेलात तळण्याऐवजी एअर-फ्राय करावेत किंवा थेट टोमॅटो अन् ताकाच्या रश्श्यात हळद, हिंग, धणे घालून शिजवावेत.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
गोड पदार्थांसाठी गाईच्या तुपात दुधी परतून त्यात साखरेऐवजी गूळ, वेलची, केशर आणि सुकामेवा घालून आरोग्यदायी खीर किंवा हलवा तयार करावा.
Ayurvedic Benefits of Bottle Gourd
sakal
गोरिला स्वतःची छाती का बडवतात? काय आहे कारण?
Why Do Gorillas Beat Their Chests
sakal