सकाळ डिजिटल टीम
चाकवत भाजी (बथुआ) आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी जास्त सेवन केल्यास त्याचे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात.
चाकवत मध्ये जास्त फायबर असतो, जे जुलाब किंवा पचनाच्या समस्यांना उत्तेजित करू शकते. कमजोर पचनसंस्थे असलेल्या व्यक्तींनी चाकवत जास्त प्रमाणात न खाल्लेले उत्तम.
चाकवत मध्ये असलेल्या ऑक्सॅलिक अॅसिडमुळे कॅल्शियमची कमी होण्याची शक्यता असते. जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी असेल, तर चाकवतचे जास्त सेवन टाळा.
स्किन एलर्जी असलेल्या व्यक्तींनी चाकवत खाल्ल्यास त्वचेवर रॅशेस, खाज, पुरळ आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
चाकवत भाजीमध्ये प्रजननविरोधी गुणधर्म असतात. म्हणून, जर तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असाल, तर चाकवत भाजीचे सेवन मर्यादित करा.
चाकवत भाजीमध्ये फायबर, लोह, आणि पोटॅशियम असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात, पण त्याचे सेवन योग्य प्रमाणातच करा.
चाकवत जास्त खाल्ल्यामुळे आरोग्याच्या इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे चाकवत भाजीचे सेवन साधारण प्रमाणात करा.