Yashwant Kshirsagar
जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर मोरिंगा डिटॉक्स वाटर खूप फायदेशीर आहे.
मोरिंगा डिटॉक्समध्ये पोषण घटक असल्याने मेटाबोलिझ्म बुस्ट होते, अन्न पचण्यास मदत होते शिवाय फॅट कमी होतात.
मोरिंगा म्हणजेच शेवग्याचे खूप फायदे आहेत. याला जादूचे झाड म्हटले जाते. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, असल्याने वजन कमी करण्यास खूप मदत होते.
यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहते. मेटाबोलिझ्म नैसर्गिकरित्या वाढते.
मोरिंगा डिटॉक्स वाटर तयार करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात शेवग्याच्या पानाची पावडर टाका, त्यात लिंबाचा रस मिसळा यानंतर चवीसाठी मध मिसळा आणि व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्या आणि प्या.
सकाळी रिकाम्या पोटी मोरिंगा वाटर डिटॉक्स घेतल्याने मोटाबॉलिझ्म बूस्ट होते, तसेच जेवण्याच्या आधी घेतले तर भूक नियंत्रित राहते. झोपण्याआधी घेतले जर पचनक्रिया सुधारते.
शेवग्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. लिव्हर साफ होते शिवाय त्वचेला चकाकी येते. आतडे साफ होते.
हा लेख इंटरनेटवरील सामान्य माहितीवर आधारीत आहे, वरील कृती तज्ज्ञांच्या सल्ल्याने अमलात आणावी.