सकाळ डिजिटल टीम
वजन कमी करण्यात शिवलिंगीच्या बिया खूपच प्रभावी ठरतात. चला जाणून घेऊया की, वजन कमी करण्यासाठी शिवलिंगीच्या बिया कधी आणि कशा खाव्यात?
शिवलिंगीच्या बिया ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्याचा उपयोग अनेक समस्यांमध्ये केला जातो. त्यापैकी एक म्हणजे वजन कमी करणे.
शिवलिंगीच्या बियांचे सेवन करणे आयुर्वेदात फायदेशीर मानले गेले आहे; पण तुम्हाला माहिती आहे का की, या बिया खाण्याचा योग्य मार्ग काय आहे?
या बियांचा उपयोग करण्यासाठी शिवलिंगी बिया कुस्करून पावडर करावी. त्याच्या बिया थेट खाल्ल्या जात नाहीत.
वजन कमी करण्यासाठी शिवलिंगी बियांची पावडर बनवा आणि दुधात घाला. १ ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा पावडर मिसळून प्या.
वजन कमी करण्यासाठी, तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी शिवलिंगी पावडर खाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी १ तास आधी पावडर घ्या.
शिवलिंगी बिया पचनशक्ती मजबूत करतात. बऱ्याच वेळा व्यायाम केल्यानंतरही वजन कमी होत नाही, कारण पचन व्यवस्थित होत नाही; पण हे घेतल्याने पचनशक्ती मजबूत होते, ज्यामुळे वजनही कमी होऊ लागते.