सकाळ डिजिटल टीम
मूत्रपिंडातील खडे म्हणजे खनिजे आणि क्षार जमा होऊन तयार झालेली कठीण रचना असते. हे मुख्यतः कॅल्शियम ऑक्सलेट, युरिक अॅसिड किंवा इतर घटकांपासून बनतात.
मूत्रपिंडात खडे झाल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक असते. या संदर्भात अनेकांना प्रश्न पडतो, की "दही खाल्ल्याने खड्यावर परिणाम होतो का?"
दही हे कॅल्शियम, प्रोटीन, प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या पोषक घटकांनी भरलेले असते. ते पचनही सुधारते. परंतु, किडनी स्टोन रुग्णांनी दही मर्यादित खावे
दहामध्ये असलेले कॅल्शियम काही वेळा कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन्स वाढवू शकते. पण दुसरीकडे, ते ऑक्सलेटशी संलग्न होऊन त्याचे शोषण कमी करते, ज्यामुळे स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो.
दह्यात असलेले प्रोबायोटिक्स मूत्रातील युरिक अॅसिड नियंत्रित करू शकतात. त्यामुळे कमी फॅटचे दही युरिक अॅसिड किंवा सिस्टीन स्टोन असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते.
जर तुम्हाला मूत्रपिंडात स्टोन असेल, तर तुम्ही दररोज 100–150 ग्रॅम कमी फॅटचे दही खाऊ शकता, पण युरिक अॅसिड किंवा सिस्टीन प्रकार असल्यासच..
कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन असलेल्या रुग्णांनी दही खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
भरपूर पाणी प्या, जेणेकरून स्टोन तयार होण्याचा धोका कमी होईल.
दही नेहमी मर्यादित प्रमाणात आणि कमी फॅटचे असावे.