दिवसभर डेस्कवर बसून काम करता? आयुर्वेदानुसार ‘या’ ५ गोष्टी करून शरीराला द्या आराम!

Anushka Tapshalkar

पायांना उंचावर ठेवा

दिवसभर बसून काम केल्यानंतर पायांना थोडा आराम द्या. जमिनीवर पाठ टेकून झोपा आणि पोटऱ्या खुर्ची किंवा सोफ्यावर ठेवा. हात शरीराच्या बाजूला सैल सोडा आणि साधारण ६० सेकंद या स्थितीत राहा.

HOW TO TAKE HEALTHY BREAKS FROM SITTING

|

sakal

हात चोळून डोळ्यांना विश्रांती

दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून गरम करा. डोळे बंद करून तळहात हलकेच डोळ्यांवर ठेवा. मात्र डोळ्यांवर दाब देऊ नका. १५-२० सेकंद स्क्रीनपासून ब्रेक घ्या.

HOW TO TAKE HEALTHY BREAKS FROM SITTING

|

sakal

श्वासोच्छ्वास रिफ्रेश

आरामात बसा आणि खांदे सैल सोडा. श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याची वेळ थोडी जास्त ठेवा. असे ५-६ सहज श्वास घ्या. श्वासावर जबरदस्ती करू नका.

HOW TO TAKE HEALTHY BREAKS FROM SITTING

|

sakal

बोटे आणि मनगट स्ट्रेच

बोटे शक्य तितकी पसरवा आणि पुन्हा सैल सोडा. अंगठा तळहातापासून अलगद दूर करा. त्यानंतर मनगटाची हळूहळू गोलाकार हालचाल करा. यामुळे बराच वेळ टायपिंग केल्याने आलेला ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

HOW TO TAKE HEALTHY BREAKS FROM SITTING

|

sakal

छाती आणि खांदे स्ट्रेच करा

दोन्ही हात पाठीमागे नेऊन बोटे एकमेकांत अडकवा. खांदे हलकेच मागे घ्या आणि छाती किंचित वर उचला. ही स्थिती १५-२० सेकंद आरामात ठेवा.

HOW TO TAKE HEALTHY BREAKS FROM SITTING

|

sakal

शरीर रिलॅक्स करा

हे व्यायाम करताना शरीरावर अतिरिक्त ताण देऊ नका. हालचाली संथ आणि आरामदायी ठेवा. वेदना किंवा अस्वस्थता जाणवल्यास लगेच थांबा.

HOW TO TAKE HEALTHY BREAKS FROM SITTING

|

sakal

ब्रेक घ्या

फक्त दिवसाच्या शेवटी स्ट्रेचिंग करण्यापेक्षा कामाच्या वेळेतही अधूनमधून उठून थोडे चालणे, शरीराची पोझिशन बदलणे आणि स्क्रीनपासून नजर हटवणे फायदेशीर ठरू शकते.

HOW TO TAKE HEALTHY BREAKS FROM SITTING

|

sakal

भृंगराज तेलाआधीही होती केसांच्या निगेची परंपरा; जाणून घ्या ५ जुनी आयुर्वेदिक तेलं!

Ancient Traditional Ayurvedic Hair Oils

|

sakal

आणखी वाचा