सकाळ वृत्तसेवा
आयुर्वेदामध्ये एका अशा डाळीचा आणि त्याच्या रेसिपीचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे शंभर पुरुषांची शक्ती मिळू शकते.
'शंभर पुरुषांची शक्ती' असा उल्लेख त्या ग्रंथात अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरला आहे. मात्र यामुळे कामवासनेला बळकटी मिळते, असा दावा केला आहे.
कविराज श्रीगोविंददाससेनविरचिता यांच्या भैषज्यरत्नावली या प्रमुख आयुर्वेदिक ग्रंथात या डाळीबद्दल लिहिलेलं आहे.
ग्रंथामध्ये वाजीकरणाधिकारी हे प्रकरण आहे. त्यात उडदाच्या डाळीचे महत्व सांगितले आहे.
उडदाची डाळ अशा पद्धतीने दळून अथवा भरडून घ्यावी की, एका डाळीचे आठ ते दहा तुकडे झाले पाहिजेत.
त्यानंतर गावराव म्हणजे देशी तुपामध्ये डाळ चांगली भाजून घ्यायची. रंग बदलून सुवास आला पाहिजे.
पुढे ही डाळ दुधामध्ये शिजवून त्याची खीर बनवायची. त्यात चवीप्रमाणे साखर घातली तरी चालते.
ही खीर दररोज २५० मीली सेवन करायची आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूवृद्धी होण्यास मदत होते.
व्यक्तीला कामवासना जागृत होऊन तो चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतो. मात्र कच्ची डाळ खाऊ नये, त्यामुळे गॅस होऊ शकतात.
ग्रंथामध्ये शंभर पुरुषांच्या ताकदीचा उल्लेख हा अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरण्यात आलेला आहे.