Sandip Kapde
आरोग्य हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचं अंग आहे.
आजारी पडल्यास उपचारांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची शक्यता असते.
लोक अनेकदा अनपेक्षित आजारांपासून वाचण्यासाठी आधीच आरोग्य विमा घेतात.
सर्वांकडे हेल्थ इंश्योरेंस घेण्यासाठी पुरेसा पैसा नसतो.
भारत सरकारची ‘आयुष्मान भारत योजना’ गरजूंसाठी मोफत उपचाराची सुविधा देते.
योजनेअंतर्गत एका कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळतो.
ही रक्कम एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण कुटुंबासाठी लागू असते.
एखादा व्यक्ती कितीही वेळा उपचार घेऊ शकतो, फक्त ५ लाखांच्या मर्यादेत असावा.
उपचारासाठी जाण्यापूर्वी संबंधित रुग्णालय योजनेत समाविष्ट आहे की नाही हे तपासावं.
आपण ज्या आजारासाठी उपचार घेणार आहोत, तो आयुष्मान योजनेच्या पॅकेजमध्ये आहे की नाही हे निश्चित करावं.
योजना संबंधित अधिकृत वेबसाइट किंवा आयुष्मान मित्रांकडून सविस्तर माहिती मिळवता येते.
उपचारापूर्वी आपलं आयुष्मान कार्ड अॅक्टिव्ह आहे की नाही हेही तपासणं गरजेचं आहे.