सकाळ डिजिटल टीम
मेथी आणि ओव्याचे पाणी पचन सुधारण्यापासून वजन नियंत्रित करण्यापर्यंत अनेक आरोग्य फायदे देऊ शकते.
१ टेबलस्पून मेथीचे दाणे, १ टेबलस्पून ओव्याचे दाणे आणि पाणी एक ग्लास पाण्यात हे दाणे घालून रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी गाळून प्यावे.
मेथी आणि ओवा दोन्ही पचन क्रिया सुधारण्यासाठी उत्तम आहेत. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
मेथी चयापचय सुधारते, तर ओवा शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मेथी आणि ओव्याचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
मेथी आणि ओव्याचे पाणी हाडांच्या दुखण्यावर फायदेशीर ठरते आणि आराम मिळविण्यास मदत करते.
बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि खोकला होणाऱ्यांसाठी हे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे छाती हलकी होते आणि सर्दी व खोकला नियंत्रित होतो.
हे पेय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत, तरीही उपचार सुरू असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मेथी आणि ओव्याचे पाणी सकाळी प्याल्यावर शरीर ताजेतवाणं आणि अॅक्टिव राहता येत.