५ लाखांपर्यंत मोफत उपचार, जाणून घ्या कोणाला मिळू शकतं आयुष्मान भारत कार्ड?

Manoj Bhalerao

केंद्र सरकार मोफत रेशन, विमा आणि घरांसह अनेक क्षेत्रात विविध सरकारी योजना राबवत आहे, ज्या खूप लोकप्रिय आहेत.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

अशीच एक सरकारी योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना, जी २०१८ मध्ये सुरू झाली.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी आणि 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळावेत, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

पात्रतेबद्दल बोलायचं झाल्यास, रोजंदारी मजुरांपासून ते निराधार किंवा आदिवासी आणि भूमिहीन लोक अर्ज करू शकतात.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

जर एखाद्याचं कच्चं घर असेल आणि ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याच्या कुटुंबात अपंग सदस्य असेल तर ते देखील योजनेसाठी पात्र मानले जातात.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

आयुष्मान योजनेंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच कार्ड बनवू शकतात.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

या योजनेचे नाव आता 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना' असे झाले असून याअंतर्गत आशा-अंगणवाडी सेविकांनाही कव्हर केले जाणार आहे.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

ऑनलाइन पात्रता तपासण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर जावे लागेल आणि वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

आता स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा कोड एंटर करा, त्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करा आणि तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

OTP प्रविष्ट करा आणि नंतर राज्य-जिल्हा निवडा. विचारलेले सर्व तपशील भरा. असे केल्याने तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे देखील कळेल.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

यानंतर तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकाल. त्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

Ayushyaman Bharat Yojana | Esakal

दिल्लीतील शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी सरकारचा तगडा बंदोबस्त; पाहा फोटो

farmers' agitation